सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! ऐन विधानसभा निवडणुकीत मोठा धमाका

  • सोलापूर :- आचारसंहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने, सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये एक दिवसामध्ये अवैध बनावट देशी विदेशी मद्य वाहतुक करणारे एका दिवसात पकडली बारा वाहने, 15 लाख 63 हजार 313 रूपयांचा मुद्देमाल जप्त. तसेच ढाब्यांवर पिणा-यांना 2 लाखाचा दंड करण्यात आला.
  • विधानसभा निवडणूक 2024 पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर याच्या निर्देशानुसार , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर एस आर पाटील याचे मार्गदर्शनाखाली दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर शहर व जिल्हयामध्ये केलेल्या कारवाईत 15 गुन्हें नोंद करण्यात आले असून 13 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून सदर कारवाईत 2700 लि. गुळमिश्रीत रसायन, 593 लि. हातभटटी दारु, 26.25 ब.लि. देशी मदय, 84.96 विदेशी मदय, 15.6 ब.लि बिअर तसेच 77.76 ब.लि बनावट विदेशी मदय जप्त करण्यात आले असून बारा वाहने जप्त करण्यात आली असून त्यामध्ये एक चारचाकी वाहन, एक अॅटोरिक्षा व दहा मोटार सायकल सह एकुण रू 15,63,313/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
  • ही कारवाई निरीक्षक आर. एम. चवरे, जे. एन पाटील, ओ व्ही घाटगे, डी. एम बामणे ,पंकज कुंभार, भवड, मारुती मोहीते तसेच दुय्यम निरीक्षक, आर एम कोलते, धनाजी पोवार, समाधान शेळके, सुखदेव सिद, श्रीमती अंजली सरवदे, कुदळे, श्रीमती बहुधाने सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार, गुरुदत्त भंडारी, आनंद जोशी, जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, इसमाईल गोडीकट, कपील स्वामी, दिनकर शिंदे, अनिल पांढरे, विनायक काळे, विकास वडमिले, विजय शेळके, योगीरज तोग्गी, तानाजी जाधव, वाहनचालक रशीद शेख व दिपक वाघमारे यांनी पार पाडली.
  • आचारसंहिता कालावधीमध्ये दि. 15 ऑक्टोबर 2024 ते ते दि.8 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात एकुण 185 गुन्हे नोद करण्यात आले आहे. सदर कालावधीत 42 वाहनासह एकुण 1,00,30,946/- इतका मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणा-या सहा (हॉटेल सावजी, जोडभावी पेठ व हॉटेल जयभवानी, सलगरवस्ती, हॉटेल दुर्गा, होटगी रोड, हॉटेल मातोश्री, होटगी रोड, हॉटेल सावजी कोल्ड्रीक्स कन्ना चौक, ढाब्यांवरती कारवाई करुन ब्रीथ् अॅनलायझर चा वापर करुन वैदयकीय चाचणी नंतर सहा ढाबा मालक व मद्यपी ग्राहकांना मा. न्यायालायासमोर हजर केले असता ढाबा मालकास प्रत्येकी रुपये 25 हजार व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी रुपये 3 हजार इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली असून एकुण रु.2 लाख 4 हजार इतक दंड जमा करुन घेण्यात आला आहे. तसेच अशा प्रकारे अवैध ढाब्यांवर कारवाई यापुढे अशीच चालू राहणार आहे. परवाना नसणा-या ठिकाणी मद्य प्राशन केल्याने संबंधित जागा मालक व मद्यपी या दोघांवर कारवाई होऊ शकते याची नोंद संबंधितानी घ्यावी.
  • अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असून अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक 8422001133 यावर कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव, सोलापुर यांनी सांगुन अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Back to top button