महाराष्ट्र

खुशखबर! बँकेत नोकरीची संधी

आयडीबीआय बँकेने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या पाचशे रिक्त जागेवर अर्ज मागिवले आहेत. अर्ज प्रक्रियेला १२ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. तर, अर्ज भरण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारी आहे. इच्छुक उमेदवार www.idbibank.in येथे अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. परीक्षेची संभाव्य तारीख १७ मार्च आहे.
आयडीबीआयमध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या पाचशे जागा भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे. या पदांसाठी उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे.
उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. निवड प्रक्रियेत ऑनलाइन चाचणी आणि त्यानंतर ऑनलाइन चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल.
एससी / एसटी / पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क दोनशे रुपये आहे. तर, इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये शुल्क आहे.
अर्ज कसा करायचा?- इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. होमपेजवर करिअर लिंकवर क्लिक दिसेल, तिथे क्लिक करावे. जेएएम २०२४ भरती टॅब रजिस्टर अंतर्गत अर्ज लिंकवर क्लिक करा. पुढे अर्ज भरून अर्ज शुल्क भरा. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

Related Articles

Back to top button