ब्रेकिंग! शरद पवारांनी पुन्हा पलटी मारली
राज्यातील प्रचाराची रंगत वाढत आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत एका सभेत निवृत्तीचे संकेत देणारे विधान केले होते. आता या विधानाचा विपर्यास केला असल्याचे पवार यांनी म्हटले. पवार यांनी एका मुलाखतीत हे सांगितले. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उतरवले आहे.
राजकारणाच्या निवृत्तीचे संकेत दिल्याच्या विधानाबद्दल विचारले असता, ते म्हणाले मी सभेत सांगत होतो तो कुटुंबाचा विषय होता. मी २५-३० वर्षे तिथे होते, माझ्यानंतर अजित आणि त्यानंतर पुढची पिढी तयार करावी. राहिला विषय मी निवडणूक लढणार नाही याचा. तर हे आजचे नाही, २०१४ पासून निवडणूक लढलो नाही. मी २०१४ नंतर राज्यसभेवर गेलो. सुप्रिया उभा राहिली माझ्या मतदारसंघात.
आज राज्यसभेवर आहे. माझी दोन वर्षांनी टर्म संपत आहे. तेव्हा विचार करू. पण ज्या पद्धतीने मांडले गेले, निवडणुका लढणे वेगळे, राजकारणात सातत्य ठेवणे वेगळे, राजकारण आणि समाजकारणापासून बाजूला राहणार नाही. मला शक्य आहे तोपर्यंत मी करतच राहीन, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.