राजकीय

ब्रेकिंग! महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही

  • विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यातून केला. धुळ्यातील सभेत मोदींनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर घणाघाती टीका केली. राज्यातील महाविकास आघाडीची अवस्था सध्या गाडीला ना चाक ना ब्रेक अशी झाली आहे. या गाडीच्या ड्रायव्हर कोण होणार यावरून वाद सुरू आहेत, अशी खोचक टोला मोदींनी लगावला.
  • राज्य आणि केंद्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या योजनांची चेष्टा काँग्रेसचे लोक करत होते. पण आज त्याच योजना महिला सशक्तीकरणाचा पर्याय बनल्या आहेत. राज्य सरकारनेही महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, याचा मला आनंद आहे. काँग्रेस आणि त्याच्या आघाडीला हे सहन होत नाही. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेची देशात चर्चा होत आहे. पण काँग्रेस या योजना बंद करण्यासाठी षडयंत्र रचत आहे. ह्यांचे लोक योजना बंद करण्यासाठी थेट कोर्टात गेले. काँग्रेसला सत्ता मिळाली तर सर्वात आधी या योजना बंद करतील. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक महिलेने या लोकांपासून सावध राहिले पाहिजे. काँग्रेस आणि आघाडीवाले महिलांप्रती अभद्र भाषेचा वापर करत आहेत. कुणीच त्यांच्या या कृत्यांना माफ करणार नाही, अशी टीका मोदींनी केली.

Related Articles

Back to top button