राजकीय

पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यातून केला. धुळ्यातील सभेत मोदींनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

जिथे विभाजनाची आग आहे, तिथे काँग्रेसचा देशविरोधी हात आहे. याचे उदाहरण म्हणजे, काँग्रेसने काश्मिरला कलम 370 च्या माध्यमातून देशापासून वेगळे ठेवले. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान काश्मीरमध्ये लागू होऊ दिले नाही, मात्र मोदी आल्यावर बाबासाहेबांचे संविधान काश्मीरमध्ये लागू झाले. त्यामुळे काश्मीरमध्ये दलितांना वंचितांना त्यांचे अधिकार मिळाले नाहीत. कलम 370 संपवून आम्ही काँग्रेसने निर्माण केलेले प्रश्न संपवून टाकलेत, असे मोदी म्हणाले.

मी काँग्रेस आणि आघाडीतल्या लोकांना सांगू इच्छितो, पाकिस्तानच्या अजेंड्याला देशात प्रोत्साहन देऊ नका. फुटिरतावाद्यांना साथ देऊ नका, असा इशाराही मोदींनी दिला आहे. 

Related Articles

Back to top button