चर्चा तर होणारच ! अजितदादा म्हणाले…
राज्यातील प्रचाराची रंगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे वाढणार आहे. ते आठवडाभराच्या कालावधीत नऊ सभा घेणार आहेत. पुण्यात बारा नोव्हेंबरला होणारा रोड शो मोदींच्या प्रचार दौऱ्याचे वैशिष्ट्य ठरणार आहे. भाजपच्या प्रदेश शाखेने मोदींच्या प्रचाराचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, विधानसभा निवडणूक काळातील मोदींची पहिली सभा आज धुळ्यात होईल.
पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा असतांना बारामतीत सभा होईल का ? असा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आला होता. यावरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, बारामतीत मोदींची सभा होणार नाही. या मागचे मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी होणारी लढत ही कुटूंबातील आहे. यामुळे अजितदादा यांयांनी परिवारास महायुतीपेक्षा मोठे स्थान दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणुकीतील सर्वात चर्चेत आलेले बारामती मतदारसंघात पवार विरोध पवार अशी थेट लढत होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना तिकीट देण्यात आले आहे. बारामतीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत होणार असून या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.