राजकीय
शरद पवारांच्या नेत्याला मारहाण
- राज्यात आज विधानसभेसाठी मतदान होत आहे. मात्र, सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी राज्यात पाहायला मिळत आहे. राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मतदानाच्या रणधुमाळीत अनेक ठिकाणी मारहाण आणि वादावादीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, परळी येथील घाट नांदूरगावात मतदान केंद्रात तोडफोडीची घटना घडली आहे. या ठिकाणी काही जणांनी मतदान केंद्र फोडले असून ईव्हीएम मशीन देखील तोडले आहे. यामुळे येथील मतदान ठप्प झाले आहे.
- राज्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू आहे. मात्र, परळी मतदारसंघात मतदान प्रक्रियेला गालबोट लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माधव जाधव यांना मारहाण झाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी घाट नांदूरगावात मतदान केंद्रात तोडफोड केली. या केंद्रातील ईव्हीएम मशीन देखील फोडण्यात आले आहे. तसेच येथील मतदान बंद करण्यात आले आहे. बूथक्रमांक ३ वर ही तोडफोड करण्यात आली आहे.