देश - विदेश
ब्रेकिंग! अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार
- संपूर्ण जगाच्या लक्ष अमेरिकेच्या निवडणूक निकालाकडे लागले आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता मतमोजणी सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच फॉक्स न्यूजने या निवडणुकीत ट्रम्प विजयी झाल्याचे जाहीर केले आहे.
- ट्रम्प यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध होते. ज्या ज्या वेळी ते मोदींना भेटले आहेत, त्यांच्या चांगली केमिस्ट्री बघायला मिळाली आहे. ट्रॅम्प यांनी अनेकवेळा जाहीर कार्यक्रमात मोदींचे कौतुक केले आहे आणि त्यांना आपले मित्र असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प अध्यक्ष झाल्यामुळे भारतीय आयटी कंपन्यांसाठी नव्या संधी तयार होण्याची शक्यता आहे. कारण ते व्यापारात चीनबाबत कठोर धोरणाचा पुरस्कार करत आहेत. त्यामुळे तो चीनचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जाही संपुष्टात आणू शकतात. ट्रम्प यांच्या विजयाने अमेरिकेचे चीनवरील निर्भरता कमी होईल, ज्याचा फायदा भारताला होईल.
- जो बायडेन यांच्यापेक्षा ट्रम्प भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये कमी हस्तक्षेप करतील, असे परराष्ट्र व्यवहार तज्ज्ञांचे मत आहे. ट्रम्प अध्यक्ष झाल्यामुळे व्याजदरांसोबतच सोन्याचे भाव आणि अमेरिकन डॉलर जागतिक पातळीवर मजबूत होऊ शकतात, असे बाजारातील तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. तेलाच्या किमती घसरल्याचा थेट फायदा भारताला होणार आहे.