राजकीय
ब्रेकिंग! अजित पवारांचा तगडा जाहीरनामा
- राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोमात सुरू आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान आगामी विधानसभेसाठी अजितदादा पवारांकडून आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात बारामतीला प्रगत तालुका बनवण्याचे ध्येय असल्याचेही अजित पवारांनी सांगितले. अजितदादांच्या जाहीरनाम्यात लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारवरून 2100 रुपये करणार असल्याचे जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेले आहे.
- अजितदादांच्या जाहीरनाम्यात काय काय? – बारामतीत कर्करोग उपचार रूग्णालय उभारण्याच येणार, बारामती लॉजिस्टिक पार्क उभारणार, बॉक्सिंग, कुस्ती, भालाफेक खेळाडूंना प्रशिक्षणासाठी जागतिक दर्जाची क्रीडा अकदमी सुरू केले जाणार, याशिवाय ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, बारामतीला पहिले सौरउर्जा शहर बनवणार, लाडकी बहीण योजने संदर्भात बहिणींना दीड हजार नाही तर, 2100 रुपये देण्यात येणार, महिला सुरक्षेसाठी 25 हजार महिलांना पोलिस दलात समावेश करणार.