क्राईम

भरधाव कार थेट बंगल्यात घुसली, पाच जणांचा मृत्यू

  • राज्यात एक हृदयद्रावक अपघात घडला असून, लग्नसमारंभातून परतणाऱ्या कारला मोठा अपघात झाला आहे. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भरधाव वेगातील कार थेट रस्त्यालगत असलेल्या बंगल्यावर आदळली. इतका भीषण अपघात होता की कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
  • नाशिक-कळवण रस्त्यावर कोल्हापूर फाट्याजवळ हा अपघात घडला. शैला वसंत भदाण (62), सरला भालचंद्र भदाण (50), खालिक मेहमूद पठाण (50) – चालक, माधवी मेतकर (32), त्रिवेणी मेतकर (4) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण नामपूर व देवळा परिसरातील रहिवासी आहेत. मृतांमध्ये शैला भदाण आणि माधवी मेतकर मायलेकी असून त्रिवेणी ही माधवी यांची चिमुकली मुलगी होती.
  • तर भालचंद्र भदाण (52), रा. नामपूर, उत्कर्ष मेतकर (12), रा. देवळा हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून नाशिकच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
  • अपघातग्रस्त कार (MH 41 BE 5443) नामपूरहून सटाण्याकडे जात होती. नाशिकमध्ये नातेवाईकाच्या लग्नसमारंभात सहभागी झाल्यानंतर कुटुंबीय परतत होते. मात्र, चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यावर आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की बंगल्याबाहेर उभा असलेला मजबूत सिमेंटचा खांबदेखील वाकून गेला.
  • हा अपघात संपूर्ण भदाण व मेतकर कुटुंबावर काळाची झडप टाकणारा ठरला. लग्न समारंभानंतर आनंदाने घरी परतणाऱ्या या कुटुंबाच्या सहलीचा शेवट अशा दुर्दैवी पद्धतीने होईल, याची कल्पनाही कोणाला आली नव्हती. 

Related Articles

Back to top button