राजकीय

ब्रेकिंग! भाजपचे धक्कातंत्र, राज्यातील 40 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

  • राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोमात सुरू आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. स्टार प्रचारकांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पण, अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. याचा मोठा फटका महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही बसणार आहे. दोन्ही आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी शमवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. यात काही ठिकाणी यश आले पण काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली. यानंतर आता या बंडखोर आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात झाली आहे. दरम्यान कारवाईचा पहिला बडगा भाजपाने उगारला आहे.
  • निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून ४० सदस्यांवर कडक कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपच्या या कारवाईची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
  • भाजपातील अन्य वरिष्ठ नेत्यांनी बंडखोर उमेदवारांची भेट घेत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी कारवाईचा इशाराही दिला. याचा परिणाम काही ठिकाणी दिसला. बऱ्याच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण काही मतदारसंघातील बंडखोरांनी पक्षाच्या आदेशालाही जुमानले नाही. अर्ज माघारी घेतले नाहीत. आता अशा बंडखोरांवर पक्षाने कारवाईस सुरुवात केली आहे. पहिल्याच टप्प्यात तब्बल ४० जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
  • यामध्ये बडनेरा येथील तुषार भारतीय, नालासोपारा येथील हरिश भगत, मागठाण्यातील गोपाळ जव्हेरी, विशाल परब, श्रीगोंद्यातील सुवर्णा पाचपुते, नेवाशातील बाळासाहेब मुरकुटे, अक्कलकोट येथील सुनील बंडगर, अमरावतीमधील जगदीश गुप्ता आणि साकोली येथील सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण ४० जणांचा समावेश आहे. 

Related Articles

Back to top button