राजकीय

आता सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही

राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोमात सुरू आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले आहे. आता उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. स्टार प्रचारकांच्या सभा सुरू झाल्या आहेत. पण, अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. याचा मोठा फटका महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही बसणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी विधानसभा निवडणुकीत जोरदार ताकद लावली तरच आपले सरकार येईल. राज्यात आपले सरकार आल्यावर तुम्हाला पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा, आता काय कुणाला अजिबात घाई नाही, असे वक्तव्य शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. पलूस तालुक्यातील औदुंबरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेत पाटील बोलत होते.पलूस कडेगाव मतदारसंघात विकास भरपूर झाला आहे. तरीदेखील आणखी काही विकास कामे असतील तरी सांगा, असे आमदार कदम म्हणतात. त्यामुळे कर्णाचा दुसरा अवतार म्हणजे विश्वजीत कदम. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया, असेही पाटील म्हणाले.

राजकारण बाजूला ठेवू. लढायला, भांडायला भरपूर आयुष्य आहे. आता मात्र मोठं मन ठेवा, भांड्याला भांडण लागत असेल तर ते थोडसे बाजूला ठेवा आणि कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे. आज सत्ता येण्यासाठी एकेक आमदार महत्त्वाचा आहे. जर सत्ता आली नाही तर कुत्रं पण विचारणार नाही, असे म्हणत पाटील यांनी बंडखोरी करणाऱ्यांना एकप्रकारे इशाराच दिला.

Related Articles

Back to top button