राजकीय
ब्रेकिंग! उद्धव ठाकरेंचा नवा बॉम्ब
- आजपासून शिवसेना प्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसाठी प्रचाराची सुरुवात केली आहे. आज त्यांनी राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार के.पी. पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
- या सभेत बोलताना उद्धव म्हणाले की, तुमच्या मनात एक जो राग आहे. तो राग गेल्या अडीच वर्ष आपण आपल्या ह्र्दयामध्ये ठेवला होता. कधी एकदा वेळ येते आणि कधी या खोके सरकारला जाळून भस्म करतात, याची वाट संपूर्ण महाराष्ट्रात पाहत होता आणि आता तो क्षण आला आहे. अजनूही आपल्याला न्यायपालिकेमधून न्याय मिळालेला नाही. न्याय देवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली. मात्र त्या न्यायदेवतेला आपली देशामधील लोकशाही मरत आहे हे अजूनही दिसलेले नाही.
- म्हणून मी तुमच्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलो आहे. मी माझ्यासाठी लढत नाही. मी महाराष्ट्रासाठी लढत आहे. मीदेखील त्यांच्यासोबत जाऊ शकलो असतो. त्यांना 50 खोके दिले. मी जर अक्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर गोदाम कमी पडले असते पण, माझ्या रक्तात गद्दारी नाही, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.