सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! सोशल मीडियाच्या वापरावर करडी नजर

  • विधानसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम २०२४ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मुद्रित , इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमावर जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती (एम.सी.एम.सी.) ने अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे व उमेदवारांचा माध्यमातील सर्व निवडणूक खर्च त्यांच्या खर्च नोंदवहीत नोंदवला जाईल यासाठी दक्षता घ्यावी, असे निर्देश अकरा विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्व निवडणूक जनरल निरीक्षक यांनी दिले.
  • विधानसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम २०२४ अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय येथे जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कार्यान्वित करण्यात आली आहे.सदर समिती मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित होणाऱ्या पेड न्यूजसह तसेच सोशल मीडियाच्या वापरावरही करडी नजर ठेवण्याचे कार्य करीत आहे.त्यामुळे आज निवडणूक जनरल निरीक्षक अफसाना परवीन , निधी निवेदिता , सादिक आलम , ऋतुराज रघुवंशी, सुबोध कुमार , एमसीएमसी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश नि-हाळी यांनी जिल्हा माध्यम कक्षला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली आणि मार्गदर्शन केले.
  • यावेळी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव सुनिल सोनटक्के, समिती सदस्य तथा क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सदस्य डॉ श्रीराम राऊत, अंबादास यादव, रफिक शेख, गणेश बिराजदार, सचिन सोनवणे आणि समीर मुलाणी आदी उपस्थित होते.
  • जिल्ह्यात सध्या ११ विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू असलेल्या निवडणूक काळात माध्यम प्रमाणीकरण व माध्यम सनियंत्रण समितीची भूमिका ही अतिशय जबाबदारीची आहे.तसेच आज सर्व उमेदवारांकडून समाज माध्यमाद्वारे केल्या जाणाऱ्या प्रचारावरही या समितीने काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.विविध वृत्तपत्रात येणाऱ्या संशयीत पेड न्यूज शोधून संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात तो खर्च समाविष्ठ करावा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे समितीने कामकाज करावे.समितीने दैनंदिन पेड न्यूजचा अहवाल खर्च समितीला नियमितपणे सादर करावा आणि समितीचे कामकाज अतिशय जबाबदारीने पार पाडावे अशी सुचना केली.

Related Articles

Back to top button