राजकीय

बिग ब्रेकिंग! शरद पवार राजकारणातून संन्यास घेणार?

विधानसभा निवडणुकीत काल अर्ज माघारीची मुदत संपली. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र काही मतदारसंघात बंडखोरी झालीच आहे. या बंडखोरांचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीलाही बसणार आहे. बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करण्याचे प्रयत्न काही ठिकाणी मात्र अपयशी ठरले. बारामतीमधून मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार हे बारामती मतदारसंघात दौरे करत आहेत, सभा घेत आहेत, त्यावेळी बोलताना पवार यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. सभेत बोलताना पवार म्हणाले, मी सांगू इच्छितो की, मी सरकारमध्ये नाही. अजून दीड वर्ष आहेत, पुन्हा राज्यसभेत जायचे का नाही याचा विचार मला करावा लागणार आहे. आता मी निवडणुका लढवणार नाही. 14 वेळा मी निवडणुका लढवल्या आहेत. महाविकास आघाडीचा पाठिंबा हा युगेंद्र पवार यांना असून एक नवीन नेतृत्व आहे. त्यांना साथ द्या, असेही पवार यांनी सांगितले.

मी सत्तेत नाही. मी राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष बाकी आहे. दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचे की नाही याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीही निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका करायच्या. आतापर्यंत 14 निवडणुका केल्या. तुम्ही एकदाही घरी पाठवले नाही. दरवेळी निवडून देत आहात. त्यामुळे कुठे तरी थांबले पाहिजे. नवी पिढी समोर आली पाहिजे, हे सूत्र घेऊन मी कामाला लागलो आहे, असे पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button