राजकीय
ब्रेकिंग! भाजपला तगडा झटका
- विधानसभा निवडणुकीत काल अर्ज माघारीची मुदत संपली. अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र काही मतदारसंघात बंडखोरी झालीच आहे. या बंडखोरांचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीलाही बसणार आहे. बंडखोर आणि अपक्षांची मनधरणी करण्याचे प्रयत्न काही ठिकाणी मात्र अपयशी ठरले.
- आताही भाजपाला धक्का देणारी मोठी बातमी समोर आली आहे. भाजपा नेत्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गावित यांच्या या निर्णयाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला तगडा झटका बसला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्याने पक्षाला अडचण होऊ नये म्हणून मी राजीनामा देत आहे, असे गावित यांनी म्हटले आहे.
- नंदूरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजपच्या सदस्य पदाच्या राजीनामा दिला आहे. गावित या अक्कलकुवा मतदारसंघातून इच्छुक होत्या. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांकडे तशी मागणी देखील केली होती. परंतु मतदारसंघ शिंदे गटाला सुटला. त्यामुळे गावित यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असे सांगितले जात होते.