ब्रेकिंग! अक्कलकोट मतदारसंघात वंचित आघाडीचा धमाका
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोषकुमार इंगळे यांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी गावभेट दौर्यास सुरुवात झाली आहे.
या मतदारसंघात महायुतीकडून आमदार सचिन कल्याणशेट्टी तर महाविकास आघाडीकडून माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे निवडणूक लढवित आहेत. त्यातच वंचित आघाडीनेसुद्धा आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविला असून या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे. इंगळे यांच्या प्रचारार्थ सांगवी, शिरसी, गोसावी वस्ती, कोळी बेट येथे गावभेट दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सांगवी येथे जेसीबीद्वारे हार घालून इंगळे यांचे स्वागत करण्यात आले.
महायुतीकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे. विकासाच्या नावावर मतदारांना फसविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे देशाची अधोगती होत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी अजूनही चाचपडत आहे. स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी वंचित आघाडीला साथ द्या, असे आवाहन इंगळे यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, सिध्दार्थ बनसोडे, रवी कोटे, विशाल ठोंबरे, गंगाधर वाघमारे, बबन गायकवाड, रमजान मुल्ला, आनंद सोनकांबळे आदी उपस्थित होते.