राजकीय

ब्रेकिंग! हिंदुहृदयसम्राट काढले, जनाब लावले….

  • काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदूहृदयसम्राट लावणे बंद केले, असे म्हणत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्याच सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज यांची आज डोंबिवलीमध्ये प्रचारसभा पार पडली. कल्याण पश्चिमचे उमेदवार उल्हास भोईर, उल्हासनगरचे उमेदवार भगवान भालेराव, मुरबाडच्या उमेदवार संगीता चेंदवणकर यांच्यासाठी ही सभा पार पडली.
  • गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या युती आणि आघाड्या, पक्षफुटीच्या मुद्द्यावर राज यांनी परखड मत मांडले. 2019 ला तुम्ही मत दिले ते लोक कुठे आहेत ते सांगून दाखवा, असे म्हणत राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केले.
  • ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात निवडणुका लढल्या, त्यांच्यासोबत जाऊन बसले उद्धव ठाकरे. कारण सांगितले की अमित शहांनी शब्द पाळला नाही. पण उद्धव ठाकरेंसमोर नरेंद्र मोदी, अमित शहा सांगितलं होतं की, देवेंद्र फडणवीस आमचे पुढचे मुख्यमंत्री असतील. मग तुम्ही तिथेच आक्षेप का नाही घेतला असे म्हणत उद्धव ठाकरे यांना सवाल केला. 
  • जेव्हा उद्धव ठाकरेंना कळाले की, आमच्याशिवाय भाजपचा मुख्यमंत्री होत नाही, तेव्हा उद्धव म्हणाले अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्या, नाही तर आम्ही वेगळी भूमिका घेऊ. पण उद्धव हे राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेल्यावर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोरचे हिंदुहृदयसम्राट हे नाव काढून टाकले. काही बॅनरर्सवर जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिलं. स्वत:च्या स्वार्थासाठी, खुर्चीसाठी एवढ्या खालीपर्यंत गेला तुम्ही? असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव यांच्यावर हल्लाबोल केला.

Related Articles

Back to top button