राजकीय

…तर भाजपला फायदा झाला असता

  • राज्यात विधानसभा निवडणुकीची धुमश्चक्री सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठीचे अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून आपापल्या बंडखोरांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. दरम्यान मराठ्यांना ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय आज जाहीर केला. दरम्यान, जरांगे यांना बारामतीतून आदेश गेला असावा. त्यामुळे त्यांनी रणांगणातून पळ काढला असावा, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. जरांगे यांचा निवडणूक न लढण्याचा निर्णय हा त्यांचा निर्णय आहे. यात महाविकास आघाडीचा कुठलाही संबंध नाही. जसा निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता, तसाच निवडणूक न लढवण्याचा निर्णयही त्यांचाच आहे, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली आहे. मुंबईत पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान सर्व मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बंडखोरांना समजवण्यात यश येत आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडखोरांशी बोलत आहेत. आम्हाला कोणत्याही मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत नको आहे, असे पवार यांनी सांगितले.
  • जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे. भाजपला आमचा विरोध आहे, असे जरांगे सतत सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगेंनी उमेदवार उभे केले असते तर त्याचा लाभ भाजपला झाला असता, असे पवार म्हणाले.

Related Articles

Back to top button