सोलापूर
ब्रेकिंग! सोलापूर दक्षिण मतदारसंघात मोठा ट्विस्ट
- राज्यात विधानसभा निवडणुकीची धुमश्चक्री सुरु आहे. विधानसभा निवडणुकीसाठीचे अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून आपापल्या बंडखोरांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. एकीकडे महायुतीच्या प्रमुख नेत्यांना त्यांच्या उमेदवारांचे बंड शमवण्यात यश येत असतानाच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फोनाफोनी करून बंडखोरांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली जात आहे. दरम्यान आता महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे. मविआतील जे बंडखोर अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार, असेही यावेळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितले आहे.
- दरम्यान आज सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात नवीन ट्विस्ट पहावयास मिळाला. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आलेल्या व अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या दिलीप माने यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला.
- तसेच त्यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना आपला पाठिंबा देखील जाहीर केला. माने यांच्या निर्णयामुळे या मतदारसंघात कडवी लढत पहावयास मिळणार आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघात आता महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख, ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील व धर्मराज काडादी यांच्यात लढत होईल.