राजकीय

जरांगेंची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटाची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले…

  • मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. एका जातीवर निवडणून येणे शक्य नाही. हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. मराठा समाज बांधवांनी आपापले अर्ज मागे घ्यावेत, असे जरांगे म्हणाले.
  • याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, जरांगे यांचा संघर्ष जो आहे. जो सातत्याने महाराष्ट्रात सुरु आहे. हा संघर्ष त्यांच्या समाजाचा विकासासाठी, उद्धारासाठी आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. समाज त्यांच्या पाठिशी उभा आहे, हे मान्य केले पाहिजे.
  • निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा जो लढा आहे हा आम्ही स्वत: राजकीय मानत नाही. हा सामाजिक लढा आहे. ही एक सामाजिक चळवळ आहे. नक्कीच त्यांच्या लढ्याला आमच्या कायम शुभेच्छा आणि पाठबळ राहिल, असे राऊत म्हणाले.

Related Articles

Back to top button