ब्रेकिंग! ठाकरे गटाचा मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीची धुमश्चक्री सुरु असून जवळपास आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात काही उमेदवार आज आपले नामांकन अर्ज मागे घेऊ शकतात. अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असून अवघे काही तास शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने शेकापसाठी तीन जागा सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. ठाकरे गटाने पेण, पनवेल आणि अलिबाग मतदारसंघात उमेदवार जाहीर केले होते. मात्र ठाकरे गटाने या तिन्ही जागा शेतकरी कामगार पक्षाला सोडल्या आहेत. या जागांवरील उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याचे ठाकरे गटाने सांगितले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हे आघाडी धर्म पाळणार आहेत. जिथे बंडखोरी झाली, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न असेल. दुपारपर्यंत लढतींचे चित्र स्पष्ट होईल. पेण, पनवेल आणि अलिबागमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले होते. या तिन्ही जागा शेकापसाठी सोडण्यात येणार आहेत. तिन्ही ठिकाणचे ठाकरे गटाचे उमेदवार आज अर्ज मागे घेतील.