राजकीय
ब्रेकिंग! जरांगेची माघार, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये माघार घेण्याची घोषणा केली. आज त्यांनी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास सांगून निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले. यावर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके पाटलांनी निशाणा साधला. त्यांनी जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला. जरांगे मॅनेज झाले असल्याचा आरोप हाकेंनी काल केला होता. दरम्यान आज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले आहे.
- पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हाके म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून मी सांगत होतो की, जरांगेसारखा माणूस निवडणूक लढवणार नाही. बारामतीवरून येणाऱ्या स्क्रिप्टवर जरांगे नावाचा माणूस काम करत आहे, अशी मी नेहमी भूमिका मांडली आहे. निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वसमावेशक अजेंडा लागतो. एकाच जातीवर काम करून भागत नाही. लोकसभेला बारामती सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला. आज ओबीसी एकवटला आहे. त्यामुळे त्यांनी बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातून माघार घेतली आहे.



