महाराष्ट्र
ब्रेकिंग! प्रतापगडावर अफजल खान वधाचा पुतळा उभारून लाईट साऊंड शो सुरू होणार

राज्यातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. शिंदे सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यावर अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता, त्या किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
राज्य सरकारचे पर्यटन मंत्री मंगल प्रताप लोढा यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. प्रतापगडावरील अतिक्रमण नुकतेच काढण्यात येत आहे. त्यानंतर आता सरकारने हा नवा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे शिवप्रेमींना आनंद झाला आहे.
यंदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यटनाला चालना देण्यासाठी ऐतिहासिक किल्ले प्रतापगडावर महाराज अफजलखानाचा कोथळा बाहेर काढत असतानाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच लाईट व लेझर शो सुरु करण्यात येणार आहे, असेही या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.