खेळ
ब्रेकिंग! रोहित शर्माचे कर्णधारपद जाणार?
- न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केला. न्यूझीलंडने पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका जिंकली आहे. तर भारतीय संघाने तब्बल १२ वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे.
- याआधी २०१२ मध्ये इंग्लंडने भारताला हरवले होते. भारतीय संघाच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
- सोशल मीडियावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, रोहितला कसोटीच्या कर्णधारपदावरून काढून टाकावे. पण रोहितकडून कर्णधारपद हिसकावण्याची हीच योग्य वेळ आहे का? जर रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले तर कोणता खेळाडू या पदासाठी योग्य आहे.
- आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे, पण या मालिकेनंतर भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदात बदल शक्य आहे का? आता प्रश्न असा आहे की रोहितला कर्णधारपदावरून हटवले तर दावेदार कोण?
- रोहितनंतर भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद ऋषभ पंत, केएल राहुल किंवा जसप्रीत बुमराह यांच्याकडे दिले जाऊ शकते. या खेळाडूंचे दावे जोरदार आहेत, पण कोणत्या खेळाडूला कर्णधारपद मिळते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
- दरम्यान भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय निर्णय घेऊ शकते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीनंतर रोहित शर्माच्या जागी नव्या कर्णधाराचे नाव निश्चित होऊ शकते.