राजकीय
ब्रेकिंग! विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांना दणका
- राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अशातच इंदापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे इंदापूर दौऱ्यावर होते.
- मात्र पवार यांचा दौरा आटोपताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.
- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाराज नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी पवार यांची साथ सोडत इंदापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
- हर्षवर्धन पाटील यांना दिलेल्या उमेदवारीवरून जगदाळेंनी नाराजी व्यक्त केली होती. जनतेसमोर खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला साथ देणार नाही, असे जगदाळे यांनी म्हटले होते, त्यानंतर आज त्यांनी भरणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षातील नाराज असलेले इंदापुरातील पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळेंनी मोठा राजकीय निर्णय घेतला असून याचा फटका शरद पवार गटाला बसणार आहे.