राजकीय
ब्रेकिंग! शिंदे गटात खळबळ

- सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार रिंगणात आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र दाखल केले होते. या शपथपत्रामध्ये तब्बल 16 चुका आहेत, अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. सत्तार यांनी चारचाकी वाहन, मालमत्ता आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसदर्भात खोटी माहिती दिली, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी केला.
- त्यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. शंकरपेल्ली यांनी केलेल्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. सत्तार यांना 24 तासाचा वेळ दिलेला आहे. सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सत्तार यांनी मालमत्तेसंदर्भात माहिती लपवली, असा आरोप केला गेला.
- निवडणूक आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. ई-मेलद्वारे 24 तासांच्या आत जिल्हाधिकारी आणि सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी यांना अहवाल पाठवण्याचे निर्देश सत्तार यांना दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटात खळबळ उडाली आहे.