राजकीय

‘या’ विधानसभा मतदारसंघात ट्विस्ट

  • सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात वेगळीच आघाडी पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मदत करण्याचे जाहीर केले आहे. अंबरनाथमध्ये मित्र म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश वानखेडे यांना नक्की मदत करणार, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी जाहीर केली आहे. 
  • अंबरनाथमध्ये आमचा उमेदवार नसून अजून साहेबांचे काहीही स्पष्ट आदेश आम्हाला आलेले नाहीत. वानखेडे माझे मित्र आहेत, त्यामुळे मित्र म्हणून त्यांना नक्कीच मदत करणार. पक्षाचा आदेश आल्यावर काय करायचे ते आम्ही पक्ष म्हणून ठरवू, असे पाटील म्हणाले.
  • याबाबत वानखेडे यांना विचारले असता ते म्हणाले, मनसैनिक हे माझे मित्र असून ते मला मदत करतील, याची फक्त खात्रीच नव्हे, तर गॅरंटी आहे.

Related Articles

Back to top button