राजकीय
महाविकास आघाडीत काँग्रेससाठी गुड न्यूज
- सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान अशातच वेगवेगळ्या संस्थांकडून निवडणुकीचे सर्वे आता समोर येऊ लागले आहेत. इलेक्टोरल एजचे या निवडणुकीबाबतचे प्री-पोलने केलेल्या सर्वेक्षणातून काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणात महाविकास आघाडीच्या बाजूने सर्वात जास्त कल असल्याचे समोर आले आहे.
- इलेक्टोरल एज प्री-पोल सर्वेक्षणानुसार, महाविकास आघाडीला राज्यात बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीला राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 157 जागा मिळू शकतात. काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. काँग्रेसला सर्वाधिक 68 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 44 जागा आणि ठाकरे गटाला 41 जागा मिळू शकतात.
- या सर्वेक्षणानुसार राज्यात महायुतीला केवळ 117 जागा मिळू शकतात. त्यापैकी भाजपाला सर्वाधिक 79 जागा मिळू शकतात. याशिवाय शिंदे गटाला 23 जागा, राष्ट्रवादीला 14 जागा मिळू शकतात.