सोलापूर

ब्रेकिंग! ऐन दिवाळीत सोलापूरकरांना खुशखबर

  1. सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटल या दरम्यानचा ५४ मीटर रुंद पर्यायी रस्ता प्रगतीपथावर असून, हे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दमाणी नगर येथील १०२ वर्षे जुना पूल मध्य रेल्वेच्या वतीने पाडण्यात येणार आहे. त्यामुळे रहदारीच्या समस्येवर मात करण्यासाठी सोलापूर विकास मंचने गेल्या काही वर्षांपासून रेल्वे प्रशासन आणि सोलापूर महानगरपालिकेकडे सातत्याने मागणी करून हा रस्ता मार्गी लावला आहे.
  2. सदर रस्त्याच्या निर्मितीसाठी स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडून फारसे गांभीर्य दिसून येत नव्हते. मात्र, सोलापूर विकास मंचच्या तगड्या आणि अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळेच या रस्त्याचे काम आकार घेत आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
  3. सोलापूर विकास मंचच्या पाठपुराव्यामुळेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत डिपीडीसी (DPDC) मधून या ५४ मीटर रुंद रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला. या निधीच्या मंजुरीमुळे सोलापूरकरांना वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका मिळणार आहे. ह्या करिता सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, केतन शहा, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षिरसागर ह्यांनी विषेश प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button