राजकीय
ब्रेकिंग! दिवाळीत मोठा धमाका, अजितदादांचा मूड बदलला…
- सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
- राज्यात मुख्यमंत्रीपदावर दावा असल्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी पुन्हा अप्रत्यक्षपणे नमूद केले. आज बारामती तालुक्यातील सुमारे ५९ गावांत अजितदादांनी दौरा केला. त्यावेळी महायुतीचे सरकार येणार, येणार, येणार असे म्हणत त्यांनी आपल्याला चांगले पद मिळणार, मिळणार, मिळणार, असे त्रिवार सांगत छातीठोकपणे प्रचार केला. दादांच्या या वक्तव्याची आज महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली.
- अजितदादा यांनी लोकसभेतील पराभव विसरून नव्या दमाने सुरुवात केली आहे. आज त्यांनी बारामती तालुक्यातील 59 गावांचा दौरा केला. झारगडवाडी येथील सभेतील त्यांचे भाषण चांगलेच गाजले. महायुतीचे सरकार येण्याचा मानस त्यांनी त्रिवार व्यक्त केला. काही झाले तरी महायुतीचे सरकार येणार.. येणार..! आणि आपल्याला चांगले पद मिळणार, मिळणार, मिळणार…! असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.