क्राईम

पोलिसांचा शर्ट फाडला, दगड मारला

  • रुट मार्च सुरू असताना एका रिक्षा चालकाने पोलिसांना मारहाण करत शर्ट फाडला. तर त्याच्या पत्नी व आईने महिला पोलिसांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना पुण्यातील जनता वसाहत परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपी रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
  • या प्रकरणी अविनाश उत्तम कांबळे (वय 35, रा. पर्वती) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ दास चौधरी (वय 40, रा. पर्वती) या रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तर त्याच्यासह त्याची पत्नी राणी सोमनाथ चौधरी आणि आई सिताबाई दास चौधरी (रा. जनता वसाहत,पर्वती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जनता वसाहतीतील शंकर मंदिराजवळ घडली. पर्वती पोलीस ठाण्यातील 7 पोलीस अधिकारी, 43 पोलीस अंमलदार, बीट मार्शल व सीमा सुरक्षा दलाची एक तुकडीचा मिळून जनता वसाहत परिसरात पायी रुटमार्च सुरू होता.
  • त्यावेळी गल्ली नं. 108 चे दिशेने आरोपी रिक्षाचालक जात होता. ते पाहून बीट मार्शल खाडे व सुर्वे यांनी पोलीस व्हॅनला रस्ता करून देण्यासाठी रिक्षा चालकाला त्याची रिक्षा बाजूला घ्यायची विनंती केली. त्यावेळी रिक्षा चालकाने रिक्षा बाजूला न घेता रस्त्याच्या मधोमध आडवी लावून रस्ता अडवला. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी पोलिसांनाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
  • त्यामुळे पोलिसांनी त्याला बाजूला घेतले. तेव्हा त्याने पत्नी आणि आईला बोलावून घेतले. त्यानंतर फिर्यादी हे तेथे गेले व त्यांनी आपण पोलीस असल्याचे सांगून रिक्षा चालकाची व त्याच्या कुटुंबाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले मात्र त्यावर रिक्षाचालकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात करत फिर्यादी पोलिसांचा शर्ट फाडला. तर आरोपीच्या आईने व पत्नीने पोलिसांना दगड मारला. त्यावेळी महिला पोलिसांनी या दोघींना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघींनी चक्क महिला पोलिसांना चावा घेतला. या सगळ्यात पोलिसांना दुखापत झाली. त्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले व गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Related Articles

Back to top button