राजकीय
‘माल’ शब्दावरून रंगले राजकारण
- सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मुंबादेवी मतदारसंघात काँग्रेसकडून अमिन पटेल आणि शिंदे गटाकडून शायना एन सी यांच्यात मुख्य लढत होत आहे. मात्र, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी बाहेरचा माल मुंबादेवीत चालणार नाही, असे वक्तव्य करत नाव न घेता शायना यांच्यावर निशाणा साधला. याप्रकरणी शायना यांनी सावंत यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
- शायना यांच्या आरोपावर बोलताना सावंत म्हणाले की, मी 50-55 वर्षे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहे. माझ्याकडून कधीही महिलेचा अवमान झाला नाही आणि कधी होणारही नाही. मी जे काही वक्तव्य केले आहे, त्यात त्यांचे नाव कुठे असेल तर त्यांनी मला सांगावे. दुसरी गोष्ट म्हणजे माझे वक्तव्य हिंदीमध्ये आहे. मी माझ्या उमेदवारालाही ओरिजनल माल म्हणालो आहे. ते तुम्ही गाळून का सांगता? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
- दरम्यान हे वक्तव्य प्रकरण अंगावर शेकण्याची चिन्हे दिसल्यानंतर सावंत यांनी नरमाईची भूमिका घेतली असून शायना या आपल्या मैत्रिण असून त्यांचा अपमान करणार नसल्याचे म्हटले आहे.