राजकीय

शरद पवारांसाठी गुड न्यूज!

  1. सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने एक दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगात धाव घेतली होती. इंग्रजी वाद्य ट्रम्पेट आणि मराठी वाद्य तुतारी यांच्यात फरक असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सांगितले होते. आता निवडणूक आयोगाने या निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
  2. निवडणूक आयोगाने तुतारीबाबत महत्वाचा निर्णय दिला आहे. ज्याचा फायदा विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला होऊ शकतो.
  3. काही दिवसांपूर्वी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती की, Trumpet नावाचे जे स्वरवाद्य आहे, त्याचे भाषांतर तुतारी असे करण्यात आले आहे. मात्र हे भाषांतर चुकीचे असून आमच्या पक्षाच्या चिन्हाच्या नावाशी ते तंतोतंत जुळत आहे आणि त्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होत असून मतदार चुकून तुतारीला मते देण्याऐवजी त्या Trumpet हे चिन्ह घेऊन उभ्या असलेल्या उमेदवाराला मतदान करत आहेत, अशी तक्रार शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती.
  4. यावर आता निवडणूक आयोगाने निर्णय देत Trumpet नावाचे मराठीत भाषांतर ट्रम्पेट असे करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आता विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Back to top button