क्राईम

भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या

  • सध्या दिवाळी उत्साहात साजरी केली जात असताना राजधानी दिल्ली गोळीबाराच्या घटनेने हादरली. दिल्लीतल्या शाहदरा परिसरात काल रात्री फटक्यांच्या आवाजात गोळीबार करून काका-पुतण्याची हत्या करण्यात आली आहे. घरी दिवाळी साजरी करत असतानाच सर्वांसमोर आकाश आणि त्यांचा पुतण्या ऋषभ शर्मावर गोळीबार झाला.
  • दिल्लीत दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले असून तपास सुरू आहे. आकाश हे त्यांचा मुलगा आणि पुतण्यासोबत दिवाळी साजरी करत होते. मुले फटाके उडवत असताना स्कुटीवरून दोघे आले. त्यापैकी एक जण खाली उतरून उभा राहिला आणि दुसरा व्यक्ती स्कुटीवरच होता.
  • आकाश मुलांसोबत फटाके उडवत होते, तेव्हा हल्लेखोरांपैकी एकाने आकाश यांच्या पाया पडत काका रामराम असे म्हटले. त्यानंतर हाच आहे गोळी मार, असे म्हणताच दुसऱ्याने गोळीबार केला. तेव्हा घरात पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आकाश यांना घरात घुसून मारले गेले. हल्लेखोरांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर घराच्या दारातच केलेल्या या हल्ल्याने सगळेच हादरले आहेत.

Related Articles

Back to top button