राजकीय

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच नको ते घडले

  • सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान, मागील निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीमुळे नवीन समीकरण दिसून आले. तर, दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट झाले. याच बदललेल्या राजकारणात आणखी एक गोष्ट घडली आहे. गिरणगावात शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक गोष्ट घडली आहे. बालेकिल्ल्यातील शिवडी विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच धनुष्य बाणाशिवाय आणि मुख्य म्हणजे शिवसेनेचा उमेदवारच नसणार आहे.
  • शिवडी मतदारसंघातील लालबाग-परळ हा गिरणगावचा एक भाग समजला जातो. बहुसंख्य मराठी भाषिक, गिरणी कामगारांचा हा परिसर आहे. मराठी सण, उत्सवांची मोठी परंपरा या भागात सुरू आहे.
  • शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या भागात यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार अजय चौधरी हे उमेदवार असणार आहेत. तर, त्यांच्यासमोर मनसेचे बाळा नांदगावकर हे उमेदवार आहेत. महायुतीमधील शिंदे गट आणि भाजपकडून या मतदारसंघात उमेदवार देण्यात आला नाही. शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाणार असल्याची चर्चा होती. भाजपच्या काही नेत्यांनी या मतदारसंघावर दावा केला होता. परंतु, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत शिंदे गट-भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नाही.
  • ठाकरे गटाचे अजय चौधरी हे मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेने उमेदवार न दिल्याने आता शिवडी मतदारसंघातून धनुष्यबाण गायब झाला आहे.

Related Articles

Back to top button