राजकीय
ब्रेकिंग! मनसेला निवडणूक आयोगाकडून सर्वात मोठा धक्का
- सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये तब्बल 250 च्या आसपास जागा लढवण्याची घोषणा केली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनसेने सात याद्या जाहीर करून उमेदवार जाहीर केले. मात्र, आता पूर्ण तयारीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एका सहकाऱ्याला निवडणुकीमध्ये तगडा झटका बसला आहे. कारण अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेने प्रशंसा अंबेरे यांना संधी दिली होती. त्यानंतर अंबेरे यांनी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र अर्ज तपासणीदरम्यान अंबेरे यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता मनसेसाठी हा सर्वात मोठा धक्का बसला आहे.
- अंबेरे यांचा अर्ज का रद्द करण्यात आला, याबद्दल सर्वच नागरिकांमध्ये प्रश्न पडला आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या निकषांमध्ये बसत नसल्याने अर्जाच्या छाणणी दरम्यान अंबेरे यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार विधानसभेच्या निवडणुकीकरिता 25 वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तीलाच उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची अट आहे.
- मात्र, अंबेरे यांचे वय हे 25 वर्षांपेक्षा कमी असल्याने त्यांचा अर्ज छाननी दरम्यान रद्द करण्यात आला आहे. तसेच अंबेरेंना वयाची 25 पूर्ण करण्यासाठी फक्त 24 दिवस कमी पडले असल्याची माहिती समोर आली आहे.