महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपचा ‘मास्टरप्लॅन’

  1. सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. शिंदे गटासह सत्तेत असलेल्या भाजपनेही आपले मजबूत अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी प्रचाराचा मास्टरप्लॅन तयार केला आहे.
  2. या अंतर्गत पक्ष विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर बड्या नेत्यांनाही उतरवणार आहे. भाजपाचे हे बडे नेते राज्यात पन्नासहून अधिक सभा घेणार आहेत. मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहासुद्धा महाराष्ट्रात अनेक जाहीर सभांना संबोधित करणार आहेत.
  3. मोदी यांनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एकूण 8 सभा घेण्याची योजना आखली आहे. दुसरीकडे, आणखी जाहीर सभांची जबाबदारी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर असणार आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही जोरदार पाठिंबा आहे. 
  4. आदित्यनाथ महाराष्ट्रात 15 सभा घेणार आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोदी 8, शहा 20, नितीन गडकरी 40, देवेंद्र फडणवीस 50, चंद्रशेखर बावनकुळे 40, तर योगी आदित्यनाथ 15 सभा घेणार आहेत. राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.

Related Articles

Back to top button