महाराष्ट्र
लाडकी बहीण योजना बंद?
राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रतिमहा दीड हजार रुपये दिले जातात. मात्र, या योजनेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अनेक आरोप केले जात आहेत. अशातच आता ही योजना बंद पडणार असल्याचा दावा काँग्रेस नेत्याकडून करण्यात आला आहे.
या योजनेसंदर्भात काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले की, महायुती सरकारने लाडकी बहीण योजना बंद केली आहे. तसेच आता निवडणूक आयोगाचे कारण देऊन ही लोकप्रिय योजना बंद केली आहे.
आता महायुती सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणांना एक पैसा देखील मिळणार नाही. तसेच महायुतीने ही योजना फक्त निवडणुकीसाठी राबवली असल्याचा दावा चेन्निथला यांनी केला आहे.