ब्रेकिंग! महाविकास आघाडीतील तिढा सुटणार
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काही मतदारसंघात एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. त्याचा तिढा सुटणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून अथवा काँग्रेसच्या नेत्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले अर्ज मागे घेण्यात येणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बंडखोरी झालेल्या काही जागांवर काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याचे नेत्यांनी सांगितले.
नाशिक, भायखळा अन्य काही जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार, बंडखोर माघार घेणार आहेत. महाविकास आघाडीच्या आज होणाऱ्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. आता उमेदवार अर्जाची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर चार नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत.
निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे 103, ठाकरे गट 96, शरद पवार गटाकडून 87 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.