राजकीय
एक मिनिट उशीर झाल्यामुळे पाच वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचे नुकसान
- जीवन जगताना जशी एक एक रुपयांची किंमत महत्वाची असते, तसेच एक मिनिट महत्वाचा असतो. एक मिनिटांची किंमत सहसा कुणी करतोच असे नाही. पण एक मिनिट जरी उशीर झाला तर रेल्वे, विमान सुटते. पण एक मिनिटांमुळे जर पाच वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचे नुकसान होत असेल तर …होय, असे नुकसान महाराष्ट्रातील एका माजी मंत्र्याचे झाले आहे. एक दोन मिनिट उशीरा पोहचल्याने त्यांचा अर्ज स्वीकारला गेला नाही आणि त्यांना उमेदवारी नामांकन दाखल करता आले नाही.
- राज्याचे माजी मंत्री, आधी काँग्रेस आणि आता वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीची तयारी करणारे दिग्गज नेते अनीस अहमद यांच्यासंदर्भात हा प्रकार घडला आहे. आता त्यांना विधानसभेची निवडणूक लढवता येणार नाही.
- अहमद हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून तिकीट मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि वंचितची नागपूर मध्य मतदारसंघाची उमेदवारी मिळवली. यानंतर ते काल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात गेले, तेव्हा एक मिनिट उशीर झाला, आता उमेदवारी अर्ज भरता येणार नाही, असे सांगण्यात आले. यामुळे ते उमेदवारीपासून वंचित राहिले.