राजकीय
ब्रेकिंग! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे एकूण संपत्ती किती?
- विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी केवळ उद्याचा दिवस उरला आहे. त्यामुळे राज्यभरात विविध पक्षाच्या नेत्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील आज ठाण्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
- यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. अशातच त्यांनी दाखल केलेल्या अर्जात त्यांच्या संपत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे.
- 2019 साली राज्याचे नगरविकास विभागाचे मंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे यांची संपत्ती 11 कोटी रुपये एवढी होती. मात्र, 2022 मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यामुळे, यंदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना ते मुख्यमंत्री आहेत. 2024 ला मुख्यमंत्री असलेल्या शिंदेंच्या संपत्तीत किती पटीने वाढ झाली याची उत्सुकता सर्वांनाच होती. त्याची आकडेवारी प्रशस्तीपत्रातून समोर आली.
- सध्या त्यांची एकूण संपत्ती 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये एवढी आहे. गत 2019 च्या तुलनेत ही संपत्ती 26 कोटी 11 लाख 85 हजार रुपयांची वाढ आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यावर 5 कोटी 29 लाख 23 हजार 410 रुपये कर्ज असून त्यांच्या पत्नीवर 9 कोटी 99 लाख 65 हजार 988 रुपयांचे कर्ज आहे.