सोलापूर
बिग ब्रेकिंग! माढा विधानसभा मतदारसंघात धक्कातंत्र
- विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपात अनेक धक्कातंत्र दिसून येत आहे. तर आता शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघात वेगळीच खेळी केली आहे.
- लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणारे भाजपवासी झालेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे आता तुतारीवर माढ्यातून उमेदवारी करणार आहेत. त्यांना शरद पवार राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आला आहे.
- या मतदारसंघातून विद्यमान आमदार बबनराव शिंदे हे स्वतःच्या मुलासाठी शरद पवार यांच्याकडे तिकीट मागत होते. त्यासाठी त्यांना अजितदादा पवार यांची साथ सोडली होती.
- तर भाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हेही इच्छुक होते. रणजितसिंह मोहिते यांना तिकीट मिळेल, असे बोलले जात होते. पण शरद पवार यांनी मोहिते, शिंदे या दोघांना टाळले असून, अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. माढाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अभिजित पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म दिला आहे.