राजकीय

एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून ; या उमेदवाराने थेट ठाकरे गटाची उमेदवारी नाकारली

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. तेव्हापासून कार्यकर्त्यांमध्ये पक्ष बदलण्याच्या प्रक्रियेने देखील वेग घेतला आहे. अशातच ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या उमेदवाराने थेट उमेदवारी नाकारली आहे. 
  • राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या लढत पाहायला मिळणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. 
  • महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यातच आता छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 
  • जाहीर केलेल्या उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली असून शिंदे गटात जाहीर प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर मध्य मतदारसंघात किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाने प्रदीप जैस्वाल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
  • या मतदारसंघात एमआयएम कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. एमआयएमकडून नासेर सिद्दिकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करीत त्यांचे नाव जाहीर केले आहे.
  • छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात तिरंगी लढत होणार होती. मात्र, आता ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात 2014 सारखी परिस्थिती म्हणजे एमआयएमचा उमेदवार निवडून येवू नये म्हणून माघार घेत असल्याचे किशनचंद तनवाणी यांनी म्हटले आहे.
  • जाहीर केलेल्या उमेदवाराने अचानक माघार घेतल्याने हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तर तनवाणी हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Related Articles

Back to top button