खेळ

ब्रेकिंग! केएल राहुलने सोपा झेल सोडला आणि…

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा अवघ्या एका विकेटने पराभव केला आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ४१.२ षटकात १ धावांवर गारद झाला.
केएल राहुलने सर्वाधिक ७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने ९ गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात अनेक चढउतार आले. सामना कधी भारताकडे झुकत होता तर कधी बांगलादेशकडे. १८७ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ एकावेळी सामना गमावेल असे वाटत होते.
मात्र, यानंतर भारतीय संघाने मैदानावर मोठ्या चुका केल्या आणि सामना हातातून निसटू दिला. यातील सर्वात मोठी चूक विकेटकीपर केएल राहुलने केली. त्याने या सामन्याच हिरो मेहदी हसनचा अगदी सोपा झेल सोडला. याचा फायदा घेत मिराज आणि मुस्तफिझूर रहमान यांनी १०व्या म्हणजेच शेवटच्या विकेटसाठी नाबाद ५१ धावांची भागीदारी रचली आणि संघाला विजय मिळवून दिला.
राहुलने मेहदी हसनचा झेल घेतला असता, तर सामना तिथेच संपला असता. या जीवदानानंतर मेहदी हसनने आपल्या संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. तो ३९ चेंडूत ३८ धावा करून नाबाद राहिला. त्याचवेळी मुस्तफिझूर नऊ धावा करून नाबाद राहिला. या विजयासह बांगलादेशने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पुढील सामना ७ डिसेंबर रोजी ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहे.

Related Articles

Back to top button