राजकीय
ब्रेकिंग! पाकिस्तानचे माजी मंत्री म्हणाले, राहुल ऑन फायर
भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला प्रत्येक सभेत घेरल्यानंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पुढे येऊन तुमच्या भारताच्या निवडणुकीत पाकिस्तानला अनावश्यक ओढू नका, असा सल्ला दिला, पण हा सल्ला पाकिस्तानातच कोणी मानला नाही आणि इमरान खानच्या सरकारमधले माजी मंत्री फवाद हुसेन स्वतःहून पुढे आले आणि त्यांनी भारताच्या निवडणुकीत नाक खुपसून बसले.
ते नाक खूपसताना हुसेन यांनी राहुल गांधींच्या एका भाषणाच्या व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला. मोदींनी राम मंदिर तर बांधले, पण तिथे सगळ्या श्रीमंतांनाच नेले. राम मंदिरात एकही दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व्यक्तीला नेले नाही, असे अशी टीका करणारा तो व्हिडिओ होता.
त्यामुळे भारताचा खळबळ उडाली. पंतप्रधान मोदींनी गुजरात मधल्या जाहीर सभांमधून या मुद्द्यावर राहुल आणि काँग्रेस यांना चांगलेच पट्ट्यात घेतले. शहजाद्याला पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तान उतावळा झाला आहे. कारण पाकिस्तानला भारतात कमजोर सरकार हवे आहे, म्हणजे ते सरकार भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवर फक्त कागदांच्या चळती असलेल्या फाईली आणि निषेधाच्या भेंडोळ्या पाठवेल त्यापेक्षा दुसरे काही करणार नाही, हे पाकिस्तानला माहिती आहे, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस आणि पाकिस्तानचे वाभाडे काढले. काँग्रेस सगळीकडून या मुद्द्यावर घेरली गेली, पण काँग्रेसच्या प्रवक्त्यांना वेगवेगळ्या टीव्ही डिबेट मध्ये त्यावर समाधानकारक उत्तर देता आले नाही. दरम्यान राहुल आज कर्नाटकच्या दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी प्रज्वल रेवण्णाच्या लैंगिक खेळाच्या व्हिडिओच्या मुद्द्यावर जेडीएस आणि भाजपला घेरले.
प्रज्वल रेवण्णा रेपिस्ट असल्याचा आरोप केला आणि त्यासाठी मोदींनी माफी मागावी, अशी भाषणबाजी केली. पण राहुल गांधींना पत्रकारांनी फवाद हुसेन यांच्या ट्विट बद्दल प्रश्न विचारल्या बरोबर राहुल मान वळवून निघून गेले. त्यांनी त्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले. ते उत्तर देणे टाळताना राहुल गांधींची चांगलीच पळापळ झाली.