राजकीय

ब्रेकिंग! उद्या मोदींचा मृत्यू झाला तर….

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दरम्यान कर्नाटकात एक विचित्र घटना घडली आहे. वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे आमदार राजू कागे यांनी पुन्हा एकदा बेताल विधान केले आहे. उद्या मोदींचा मृत्यू झाला तर दुसरा कोणी पंतप्रधान होणार नाही? असे वादग्रस्त विधान कागे यांनी केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

कागे एका जाहीर सभेत बोलताना म्हणले कि, मी ग्रॅज्युएट आहे, माझ्याकडेही मेंदू आहे आणि मी एक बुद्धिमान व्यक्ती आहे. मला विश्वास आहे की, मी देश चांगल्या प्रकारे चालवू शकतो. उद्या मोदींचा मृत्यू झाला तर दुसरा कोणी पंतप्रधान होणार नाही? आपल्या देशाची लोकसंख्या 1.4 कोटी कोटी आहे, मग यामध्ये पंतप्रधान होऊ शकतो, असा एकही व्यक्ती नाही का? असा तिखट सवाल कागे यांनी केला.

Related Articles

Back to top button