ब्रेकिंग! शिंदे गटाच्या अडचणीत वाढ
देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, महायुतीतील घटक पक्षांनी ठाणे लोकसभेची जागा शिंदे गटासाठी सोडली. यानंतर शिंदे गटाकडून ठाणे महापालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, ही जागा शिंदे गटाकडे गेल्याने ठाण्यात भाजपामध्ये नाराजी आहे. यामुळे याचा मोठा फटका शिंदे गटाचे उमेदवार म्हस्के यांना बसण्याची शक्यता आहे. आज सकाळी मुंबईतील भाजपाचे बडे नेते आणि आमदार गणेश नाईक यांची बैठक झाली आहे. या बैठकीत ठाण्याची जागा शिंदे गटाला गेल्याने अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे लोकसभा मतदारसंघात संजीव नाईक नागरिकांशी भेटी- गाठी करत होते, मात्र ठाण्याची जागा शिंदे गटासाठी सोडल्याने भाजपामध्ये नाराजी आहे.
या बैठकीमध्ये नवी मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांकडे आपली नाराजी व्यक्त करत राजीनामे देण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र नाईकांनी त्यांनी समजूत काढली. मात्र तरीही देखील शिंदे गटाच्या उमेदवारचा प्रचार करणार नसल्याची भूमिका भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी घेतली असल्याची माहिती मिळाली आहे.