राजकीय

चित्राबाईच पॉर्न फिल्म बघत असतील ; ठाकरे गटाचा पलटवार

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाच्या जाहिरातीवर टीका केली आहे.

तर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगेचच ट्वीट करत वाघ यांच्यावर पलटवार केला.
मोदी सरकारच्या कारभारावर टीका ठाकरे गटाने करताना महिला अत्याचारावर प्रश्न उपस्थित केला आहे. यासंबंधीच्या जाहिरातीवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला. या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे, अशी टीका वाघ यांनी केली. याला अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आक्रस्ताळ्याबाई (चित्रा वाघ) सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण तीन हजारहून जास्त सेक्स व्हिडीओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवना किंवा मुलुंडचे एचडी व्हिडिओवाल्याबद्दल (ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या) त्या अळीमिळी गुपचिळी करून बसल्या आहेत. पॉर्न इंडस्ट्री आपल्याकडे नाही. चित्राबाई पॉर्न फिल्म बघत असतील. आधी आपल्या पक्षाचा सल्ला घ्या, असा पलटवार त्यांनी केला.

Related Articles

Back to top button