राजकीय

ब्रेकिंग! काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर?

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. तसेच विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे.

आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे एक बडे प्रस्थ भाजपाच्या वाटेवर असून त्यांना भाजपाकडून राज्यपाल पद देण्यात येणार आहे, असे विधान करून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. आंबेडकर यांनी कोणाचे थेट नाव घेतले नसले तरी त्यांच्या विधानाचा रोख हा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे. सातारा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, माजी सैनिक संघटनेचे प्रमुख प्रशांत कदम यांच्या प्रचारासाठी आंबेडकर कराडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी वरील दावा करत राजकीय बॉम्ब फोडला.
स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही. तसेच सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचे आहे, असा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, आंबेडकर यांचा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप घडू शकतो.

Related Articles

Back to top button